मुंबई येथील अनीस फारुकी यांना ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रोफीचा त्रास आहे आणि तो 5 वर्षांचा असताना त्याचे निदान झाले. यामुळे आयुष्यभरासाठी दररोज त्यांचे स्नायू कमकुवत होत आहे.
याचा श्वसनाच्या स्नायूंवरही परिणाम झाला त्यामुळे त्याला जगण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे आणि आता तो गेल्या 24 वर्षांपासून 24 तास व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टमवर आहे.
या अश्या गंभीर आजारातही त्याच्याकडे अत्यंत सकारात्मक व प्रबळ इच्छाशक्ती आहे तसेच अतिशय हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आहे त्याने 10 च्या परीक्षेत 84% गुण मिळवले होते. त्याला निसर्गाचे सौंदर्य पहायला आवडते. तो नेहमी महाराष्ट्राच्या पर्वत आणि हिरवळीची प्रशंसा करतो.
कुटुंबियांसमवेत तो जलमंदिर पॅलेस येथे आम्हाला भेटण्यास आला आम्हाला भेटण्याची खूप आग्रही इच्छा अनेक वर्षांपासून ची होती त्याच्याकडे पाहून व त्यांचे आयुष्याविषयीचे विचार ऐकून एक नवी ऊर्जा मिळाली व डोळे भरून आले खूप वेळ आम्ही चर्चा केली.
प्रबळ इच्छाशक्ती असल्यावर 24 तास व्हेंटिलेटर वर असलेला व्यक्ती कश्याप्रकारे आपले आयुष्य आनंदात जगतो ते आज डोळ्यांनी पहिले. त्याच्या आनंदी जगण्याचे तो संपूर्ण श्रेय आपल्या आई वडिलांना देतो गेली अनेक वर्षे ते त्याचा मोठ्या हिम्मतीने सांभाळ करतात व खंबीर साथ देतात.
त्या आई वडिलांना सलाम आहे आमचा. वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना भरवला व पुढील आनंदी आयुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या.