PHOTO | उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, 80 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमध्ये काटेवाडी गावात नुकसानीची पाहणी केली .
Follow us
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमध्ये काटेवाडी गावात नुकसानीची पाहणी केली .
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील पिकांची पाहणी केली.
उद्धव ठाकरे आणि बाळासाहोब थोरात यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
राज्यातील शेतकरी उद्धव ठाकरे यांना मदतीसाठी साकडं घालत आहेत. तर मुख्यमंत्रीही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देत आहेत.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंचनाम्यांचे काम 70 ते 80 टक्के पूर्ण झाले असून सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल अशी माहिती दिली.