अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे.
आगामी चित्रपटात ती इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.
गेले अनेक दिवस ती नागिणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र या फोटोवरुन ती खरच ही भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
हे सगळे फोटो तिच्या चाहत्यांनी एडिट केले असल्याचं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
सोबतच कॅप्शनमध्ये तिनं हे फोटो एडिट करणाऱ्या चाहत्यांचे नावं सुद्धा लिहिले आहेत.
या पोस्टच्या माध्यमातून तिनं सर्वांचे आभार मानले आहेत .
हे सगळे फोटो जबरदस्त एडिट केले आहेत.
काही चाहत्यांनी तर चक्क हाताने तिचे चित्र रेखाटले आहेत.