
अकोला : अकोला जिल्हात रात्री उशिरापासून पाऊस पडला. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे गहू, हरभरा, पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. लिंबाचं झाड अक्षशहा तुटून पडले.

उभ्या असलेल्या पिकांचे आणि भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. झाडावर लागलेल्या लिंबू, संत्र्याचा बार गळून पडला. छोटे लिंबू झाडाखाली सडा पडलेले पाहायला मिळाले.

पातुर तालुक्यातील तुंलगा,दिग्रस परिसरात गारपीट पडली. तर बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, तामशी, चिंचोली, पिंपळगाव परिसरात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार मांडला.

गव्हाचे पीक बऱ्याच ठिकाणी कापणीवर आहे. पण मळणी व्हायची आहे, अशा गव्हाला या पावसाने नुकसान पोहोचवलं. अन्य पीकही उद्धवस्त झाले आहे.

शेतकऱ्यांनी आपला कांदा वाचवण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला. कांदा पिक अक्षरशहा झोपून पडला. त्यामुळे कांदा उत्पादक संकटात सापडला आहे.