US Election 2020 | बाय ‘डन’ की ट्रम्प? ‘व्हाईट हाऊसची फाईट’ रोमांचक स्थितीत
Follow us
संपूर्ण जगाचं लक्ष सध्या अमेरिकेच्या 46 राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाकडे लागलं आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार?, की डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन इतिहास घडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मतदान पार पडल्यानंतर अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये मतमोजणी पार पडत आहे. याचदरम्यान दोन्ही नेत्यांनी विजय आपलाच होणार, असा दावा केलाय.
सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यामध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय.
आम्ही योग्य स्थितीत आहोत. निवडणुकीत विजय मिळवणार असल्याचा विश्वास जो बायडन यांनी व्यक्त केला. तर अमेरिकेच्या जनतेचा कौल स्पष्ट आहे विजयी आम्हीच होणार, असा दावा ट्रम्प यांनी केलाय.
एकूणच व्हाईट हाऊसची फाईट रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. येत्या काही तासांत अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट होईल.