पृथ्वीची बहीण म्हणून ‘या’ ग्रहाची ओळख, जाणून घ्या आश्चर्यकारक रहस्यं!
अवकाशात फिरणारे ग्रह, चमचमणारे तारे, आकाशगंगा, अंतराळाच्या क्षेत्रात सुरू असलेलं संशोधन याचे बऱ्याच जणांना कुतूहल असते. (venus planet interesting facts)
1 / 5
अवकाशात फिरणारे ग्रह, चमचमणारे तारे, आकाशगंगा, अंतराळाच्या क्षेत्रात सुरू असलेलं संशोधन याचे बऱ्याच जणांना कुतूहल असते. सूर्यमालेत एक असा ग्रह आहे, ज्याला पृथ्वीची बहिण असे ओळखले जाते. मग या ग्रहावर पृथ्वीप्रमाणे जनजीवन शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
2 / 5
आज तुम्हाला शुक्र ग्रहाविषयी माहिती देणार आहोत. शुक्र हा ग्रह सूर्याच्या सूर्यापासून मध्यममानाने 10 कोटी 82 लक्ष किमी अंतरावर आहे. त्यामुळे याचे तापमान 425 डिग्री सेल्सियस इतके असते. तर जेव्हा पृथ्वीचे तापमान हे 45-50 डिग्री सेल्सियस इतके होते, त्यावेळी अंगाची लाहीलाही होते. मग तुम्ही 400 डिग्री सेल्सियसहून अधिक तापमानावेळी तुम्ही अवस्था काय होऊ शकते, याचा विचार न केलेला बरा.
3 / 5
शास्त्रज्ञांच्या मते, शुक्र एक लोखंड कोर, खडकाळ आवरण आणि सिलिकेट क्रस्टचा बनलेला आहे. या ग्रहात सल्फरिक अॅसिडचा साठा आहे. अशा परिस्थितीत, जर एखादी व्यक्ती येथे त्याठिकाणी गेली तर काही क्षणातच त्याची हाडे वितळतील.
4 / 5
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या ग्रहावर मोठ्या प्रमाणात पाणी किंवा समुद्र होते. मात्र अत्यंत उष्ण तापमान आणि ग्रीन हाऊसच्या प्रभावामुळे या पाण्याचे अस्तित्व नष्ट झाले.
5 / 5
या ग्रहावर वातावरणाचा दाब पृथ्वीच्या तुलनेत 92 पट जास्त आहे. ज्यामुळे कोणतेही अंतराळयान या ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. त्यामुळेच मनुष्याला या ग्रहापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.