अभिनेता प्रभास हा कायमच चर्चेत असतो. प्रभासची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रभासचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते हे प्रभास याच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत. अनेक अभिनेत्रींसोबत प्रभासचे नाव देखील जोडले गेले आहे.
आता नुकताच प्रभासच्या काकूने त्याच्या लग्नाबद्दल मोठे भाष्य केले आहे. प्रभासची काकू श्यामला देवीने म्हटले की, कामाच्या माध्यमातून लोकांची मने जिंकण्यासाठी प्रभास खूप जास्त मेहनत घेत आहे.
कुटुंबातील सर्वांनाच वाटते की, त्याने लग्न करावे. परंतू, योग्य वेळी लग्न होईल. प्रभासच्या लग्नाची इच्छा लवकरच पूर्ण होईल. आता प्रभासच्या काकूच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.
प्रभास याने साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही धमाकेदार भूमिका केल्या आहेत. प्रभासची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते.