घराबाहेर, लग्नाची बेडी, अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, आंधळ्यांची शाळा, वा-यावरची वरात, लेकुरे उदंड जाहली, सीमेवरून परत जा, इत्यादी नाटकांतून ठसा उमटवणाऱ्या मोघे यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ‘पुलकीत आनंदयात्री’ हा त्यांचा एकपात्री प्रयोगही जगात अनेक ठिकाणी सादर झाला आहे. रंगभूमीच्या क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ वावरलेल्या श्रीकांत मोघे यांना नाटकाने नाव, पैसा आणि प्रसिद्धी दिली.