PHOTO | 3.68 कोटींना मिळणाऱ्या फरारीची तयार केली कॉपी कार, कारमध्ये बसून विकतो टरबूज
व्हिएतनामच्या एका माणसाने याच अभिलाषेपोटी फरारी कारसारखीच दुसरी एक कॉपी कार तयार करुन आपल्या घरासमोर लावली आहे. (vietnam ferrari copy car ferrari 488 gt)
1 / 8
आपल्या घरासमोर एक महागडी गाडी उभी असावी असं प्रत्येकालाच वाटतं. व्हिएतनामच्या एका माणसाने याच अभिलाषेपोटी फरारी कारसारखीच दुसरी एक कॉपी कार तयार करुन आपल्या घरासमोर लावली आहे.
2 / 8
माणसाने तयार केलेली कार हुबेहूब फरारी कारसारखीच दिसत असून सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे.
3 / 8
विशेष म्हणजे व्हिएतनामच्या या माणसाने कॉपी फरारी कार तयार करुन फक्त घरासमोर ठेवलेली नाहीये. तर तो या कारमध्ये फिरून चक्क टरबूज विकतोय. त्याच्या या कारनाम्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हिएतनामच्या या माणसाने फरारी 488 जीटी या मॉडेलची हुबेहूब डमी कार तयार केली आहे.
4 / 8
हुडच्या खाली समोर असलेल्या मोगळ्या भागात तो टरबूज ठेवतोय. कारमध्ये बसून ठिकठिकाणी जाऊन तो हेच टरबूज विकतो आहे
5 / 8
या फोटोंमध्ये कार थांबवून माणून टरबूज विकत असलेला तुम्ही पाहू शकता. त्याने कार थांबवल्यामुळे तिला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे.
6 / 8
फरारी या कारकडे अत्यंत महागडी आणि प्रतिष्ठेची कार म्हणून पाहिलं जातं. अतिशय गुळगुळीत रस्त्यावर चालवण्यासाठीची कार म्हणून या कारची ओळख आहे. मात्र, या माणसाने तयार केलेली ही कार अत्यंत निमुळत्या रस्त्यांवरसुद्धा धावू शकते.
7 / 8
Ferrari 488 GT कारसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या या कॉपी कारकडे अत्यंत उत्सुकतेने पाहिले जात आहे. ही कार जिथे थांबेल तिथे लोक गर्दी करत आहेत. एकदा गर्दी झाली की हा माणूस तिथेच टरबूज विकणे सुरु करतोय.
8 / 8
मूळ फरारी 488 जीटी कारबद्दल सांगायचं झालं तर ही एक स्पोर्ट कार असून 661 एचपी पावर आऊटपूट देते. ही कार 760 एनएम टॉर्क जनरेट करते. भारतीय बाजारमुल्यानुसार Ferrari 488 GT या कारची किंमत 3.68 कोटी रुपये आहे. (नोट- वरील पूर्ण प्रतिमा या YouTube वरुन घेतल्या आहेत.)