Vinayak Mete : राजेगाव ते विधानपरिषद… असा होता विनायक मेटेंचा राजकीय प्रवास
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर खोपोली बोगद्याच्या नजदीक विनायक मेटेंच्या वाहनाला अपघात झाला. मात्र आपघातानंतर त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप वाहन चालकाने केला आहे. तर एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
1 / 7
आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीला निघालेले असताना शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचे अपघातात निधन झाले आहे.
2 / 7
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर खोपोली बोगद्याच्या नजदीक विनायक मेटेंच्या वाहनाला अपघात झाला. मात्र आपघातानंतर त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप वाहन चालकाने केला आहे. तर एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
3 / 7
शिवसेना- भाजप युती सरकार आल्यानंतर विधान परिषदेवर विनायक मेटे यांची वर्णी लागली. त्यानंतर त्यांचं युतीशी बिनसल आणि त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन केला.
4 / 7
बीडमधील राजेगाव येथील विनायक मेटे रहिवाशी होते. त्यांनी मराठा महासंघाद्वारे आपल्या सामाजिक चळवळीची सुरुवात केली. त्याचबरोबर 1994 साली झालेल्या निवडणुकीत विनायक मेटेंच्या मराठा महासंघाने युती सरकारला पाठींबा दिला होता.
5 / 7
विनायक मेटें यांना राष्ट्रवादी पक्षाने दोन वेळा विधान परिषद सदस्य म्हणून संधी दिली. 2014 च्या निवडणुकीत विनायक मेटे यांनी आपला शिवसंग्राम पक्ष महायुतीत सामील केलं. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना आमदारकीची उरलेली टर्म दिली गेली
6 / 7
2014 च्या निवडणुकीत विनायक मेटेंना बीडमधून पराभव पत्करावा लागला. तसेच २०१७च्या बीडमधील नगरपालिका निवडणुकीतही शिवसंग्रामाच्या उमेदवारांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेले.
7 / 7
विनायक मेटे यांचे हे भाजप व राष्ट्रवादीपक्षासोबत जोडले गेले असल्याने त्यांची वरिष्ठ राजकीय नेत्यांमध्ये उठबस असायची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, नारायण राणे, अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांसोबत त्याचे घनिष्ट संबंध होते.