विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट एका जाहीरातीच्या शुटिंग दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. ज्यावेळी अनुष्का आणि विराटची भेट झाली. त्यावेळी अनुष्का शर्माचं चांगलचं चर्चेत होतं.
विराट ज्यावेळी पहिल्यांदा अनुष्काला भेटला होता, त्यावेळी तो प्रचंड घाबरला होता असं विराटने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. त्यावेळी त्यानं तिथं एक जोक सुद्धा मारला होता.
2016 मध्ये दोघांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. कारण दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. त्यानंतर दोन पुन्हा एकत्र दिसायला लागली.
2017 मध्ये दोघांनी इटलीमध्ये लग्न केलं. त्यावेळी तिथं युवराज सिंग त्याच्या बायकोसोबत उपस्थित होता. तसेच अनुष्का विराटची घरची मंडळी उपस्थित होती.
विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांची लव्हस्टोरी खूपचं मनोरंजक आहे. आज विराट कोहलीचा 34 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर विराट कोहली जगभरातील चाहते शुभेच्छा देत आहेत.