Cricket : वीरेंद्र सेहवाग याच्या नावावरील हा विक्रम म्हणजे करियरमधील वाईट डाग, जाणून घ्या

| Updated on: Sep 21, 2024 | 11:08 PM

भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग म्हटलं की प्रत्येकाला त्याची आक्रमक बॅटींगची आठवण होते. भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये सेहवागच्या नावाचा समावेश आहे. सेहवागने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र एक असा वाईट विक्रमही सेहवागच्या नावावर आहे.

1 / 5
भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने स्फोटक फलंदाज म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. सेहवागची दहशत विरोधी संघातील बॉलरला कायम असायची.

2 / 5
ऑगस्ट 2011 मध्ये एजबॅस्टन येथे झालेल्या कसोटीत वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर एक वाईट विक्रमाची नोंद आहे.  कसोटीच्या पहिल्या डावात वेगवान गोलंदाज ख्रिस ब्रॉडने पहिल्याच चेंडूवर सेहवागला आऊट केलं.

3 / 5
दुसऱ्या डावातही सेहवाग पहिल्याच चेंडूवर तो पुन्हा बाद झाला. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसने कडक कॅच घेतला.

4 / 5
या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक याने 294 धावा केल्या होत्या. या कसोटीत भारताचा डावाने पराभव झाला होता.

5 / 5
वीरेंद्र सेहवागप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्टच्या नावावरही या वाईट विक्रमाची नोंद आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या या दोन दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दिला डाग लागला आहे.