या 948 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अशी दोन पोस्टपेड कनेक्शन्स मिळतात. | Vodafone Idea launches new plan
Follow us
Vi (वोडाफोन-आइडिया) ने 948 रुपयांचा नवा एंटरटेन्मेंट प्लस फॅमिली पोस्टपेड प्लॅन लॉन्च केला आहे. याशिवाय, व्होडाफोन-आयडियाचा 699 रुपयांचा एक वेगळा प्लॅनही आहे. नव्या प्लॅनची किंमतही 699 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. मात्र, सेकंडरी अॅड ऑनसाठी कंपनीकडून 249 रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जात आहे. त्यामुळे या प्लॅनची किंमत 948 रुपये (टॅक्सविना) इतकी झाली आहे.
या 948 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अशी दोन पोस्टपेड कनेक्शन्स मिळतात. यापैकी प्रायमरी कनेक्शनसाठी अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.
तर सेकंडरी कनेक्शनमध्ये प्रत्येक महिन्याला 30 जीबी डेटा मोफत मिळेल. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा मोफत मिळेल.
प्राईमरी कनेक्शनमध्ये आणखी पाच युजर्स अॅड करण्याची सुविधा आहे. मात्र, प्रत्येक अॅड ऑन साठी 249 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.