आईसलंडची राजधानी रेक्याविकपासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर हा भयंकर ज्वालामुखीचा स्फोट झालाय.
यानंतर जमिनीतून लालभडक लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली. यामुळे निळं आकाशही लाल झालं (Iceland Volcano About to Erupt).
Follow us

या ज्वालामुखीची रात्रीच्या वेळचे फोटो समोर आलेत. त्यात लाव्हारसाची विक्राळता लक्षात येते.
रेक्येनीस पेनिनसुलामधील हा ज्वालामुखी 800 वर्षांपासून भूगर्भात शांत होता.
आईसलंड ज्या भागात आहे तेथे दोन महाद्वीप प्लेट एकमेकांपासून दूर जातात. एक प्लेट उत्तर अमेरिकेकडे जाते. ती प्लेट अमेरिकेला यूरोपपासून दूर खेचते.
दुसरीकडे यूरेशियन प्लेट आहे. ही प्लेट दुसरी दिशेला खेचते.
या ठिकाणी 1784 मध्ये लाकी येथे स्फोट झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. 2010 मध्ये देखील असाच ज्वालामुखी स्फोट झाला होता. त्यामुळे युरोपमधील हवाई वाहतूक प्रभावित झाली होती.