पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगांवर गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे.
पावसाच्या या संततधारेमुळे, कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वरंधघाट परिसरातील धबधबे झाले प्रवाहीत झाले आहेत.
घाटाचं सौंदर्य खुललं असल्यामुळे पर्यटकांची गर्दी झाली आहे
निसर्गाचं हे रूप आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करत पर्यटक आनंद लुटत आहेत.
पाऊस उशिरा झाल्यामुळे यंदा धबधबे कधी प्रवाहीत होणार याची पर्यटक वाट पाहत होते
सुट्टीच्या दिवशी धबधबे पाहायला अधिक गर्दी होत आहे.