नुकतंच अभिनेत्री कंगना रनौतचा भाऊ करण याचं लग्न पार पडलं आहे. या लग्नात कंगनानं धमाल केली आहे. लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवाय कंगनानंसुद्धा लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.
कंगनाच्या घरात नवरीचं आगमण झालं आहे. कंगनानं भाऊ करण आणि वहिनीचेसुद्धा फोटो शेअर केले आहेत.
यादरम्यान कंगनानं अनेक व्हिडीओसुद्धा शेअर केले ज्यात ती लग्न मस्त एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कंगनानं ट्विटरवरुन आपल्या घरात लग्न असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. गेले कित्येक वर्ष घरात लग्न झालं नाही आणि आता दोन्ही भाऊ अक्षत आणि करण लग्न करत असल्याचं तिनं म्हटलं होतं.
सोबतच कंगनानं सोशल मीडियावर स्वत:चे ट्रेडिशनल कपड्यांमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. वेगवेगळ्या लूकमध्ये तिनं फोटोशूट केले आहे.
कंगनानं करण आणि अंजलीला आशिर्वाद देतानाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.