वजन कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात ओवा आणि जिऱ्याचा चहा समाविष्ट करू शकता. जिऱ्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे आपल्या शरिराला डीटॉक्स करण्यात याची मदत होते.
ओव्यात अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी इंफेक्टरी गुण आहेत. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. हे पाचक प्रणाली मजबूत करते.
जिऱ्यातील एंजाइम्स शुगर, चरबी आणि कार्बोहायड्रेट्स कमी करतात आणि आतड्यांना निरोगी ठेवतात.
डिटॉक्स टी बनवण्यासाठी एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा उकळवून घेऊ शकता.
या चहाला चविष्ट बनवण्यासाठी त्यात मध आणि लिंबू देखील घालू शकता.