टीमची ताकद वाढली, क्रिकेटमधून दोन वर्षापूर्वी घेतलेल्या त्या खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय मागे, पाहा कोण?

| Updated on: Jul 28, 2024 | 11:50 PM

आताच झालेल्या मेन्स टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. यामध्ये टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश होता. आता दोघांशिवाय टीम इंडिया मैदानच उतरलीये. चाहते दोघांनाही परत मैदानात उतरण्याचं आवाहन करत आहेत.

1 / 5
दोघेही निवृत्तीचा निर्णय मागे घेतील असं काही वाटत नाही. पण आता एका अशा खेळाडूने आपला निवृत्तीचा मागे घेतलाय. ज्याच्या संघात असल्याने टीमची ताकद दुप्पट होते.

2 / 5
 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2022 साली निवृत्ती घेतलेल्या या खेळाडूने आता यंदाचा वूमन्स टी-20 वर्ल्ड कप 2024 तोंडावर असताना आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

3 / 5
ही खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून वेस्ट इंडिजची स्टार अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन आहे. 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी या खेळाडूने पुनरागमनाची घोषणा केली आहे.

4 / 5
डिआंड्रा डॉटिनला महिला क्रिकेटमध्ये 'वर्ल्ड बॉस' या टोपण नावाने ओळखले जाते. 2010 टी-20 वर्ल्ड कपवेळी डिआंड्राने 38 चेंडूत हे शतक ठोकत इतिहासातील सर्वात वेगवान शतकाची नोंद केलेली.

5 / 5
डिआंड्रा डॉटिनने ऑगस्ट 2022 मध्ये टीम इंडियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. वेस्ट इंडिजकडून 124 टी-20 आणि 143 वन डे सामने खेळले. यामध्ये अनुक्रमे 2697 धावा आणि 3727 धावा केल्यात.