अंडी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी उकडावी, त्यासाठी योग्य पद्धत कोणती, त्याबद्दल आता अचूक माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी योग्य मार्गाने अंडी उकडण्याची पद्धत सांगितली आहे. त्यासाठी किती वेळ लागणार? त्याची माहिती दिली आहे.
अंडी योग्य पद्धतीने उकडली गेली नाही, तर अंड्याचे पांढरे कवच काढताना अडचणी होतात. कारण चांगले बॉईल न झालेल्या अंड्यासोबत त्यातील पांढरा भागही चिकटून निघू लागतो. त्यामुळे अंडी खाण्याची मजाच निघून जाते.
शास्त्रज्ञांनी अंडी उकडण्यासाठी साधारण अर्धा तास लागत असल्याचे म्हटले आहे. अंड्यातील पिवळे बलक आणि अल्बूमेन (पांढरा भाग) हे दोन्हीही वेगवेगळ्या तापमानाला पूर्ण उकडले गेले पाहिजे.
शास्त्रज्ञांनुसार पिवळ्या बलकाला उकडण्यासाठी 65 डिग्री सेल्सियस पर्यंतचे तापमान लागते. तर अंड्याचा पांढरा भाग उकडण्यासाठी 85 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान लागते. 100 डिग्री सेल्सिअसला पांढरा भाग परिपूर्ण होतो.
अंडी उकडण्याबाबत एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यात अंडी उकडण्याच्या पद्धतीला 'sous vide' नाव दिले गेले. यामध्ये अंडी 60 ते 70 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात एका तासासाठी ठेवले जातात.