IPL स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगचा ठपका, बदनामी आणि तुरुंगवास ! या खेळाडूंचं करिअर असं संपलं

क्रिकेट विश्वात आयपीएल स्पर्धा ही सर्वात श्रीमंत स्पर्धा आहे. या स्पर्धेत लिलावापूर्वी खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होतो. या स्पर्धेचा नावलौकिक असला तरी काही खेळाडूंना तुरुंवासही भोगावा लागला आहे. काही जणांचं क्रिकेट करिअरही संपुष्टात आलं आहे.

| Updated on: Mar 28, 2023 | 1:33 PM
आयपीएलमध्ये खेळण्याचं क्रिकेटपटूंचं स्वप्न असतं. कारण स्पर्धेत चांगली कामगिरी करून नावलौकिक मिळवण्यास उत्तम संधी असते. मात्र असं असलं तरी आयपीएल खेळलेल्या काही खेळाडूंना बदनामी आणि तुरुंगवास भोगावा लागला आहे. काही जणांना पोलिसांनी अटक केली. तर काही जण तुरुंगात जाऊन आले.  (PC-IPL Photo)

1 / 6
आयपीएल स्पर्धा फिक्सिंगमुळे चर्चेत आली होती. 2013 च्या आयपीएल पर्वात स्पॉट फिक्सिंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स संघाना दोन वर्षांची बंदी सहन करावी लागली होती. राजस्थानचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत फिक्सिंगमध्ये अडकला होता. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. श्रीसंत मुंबईत आपल्या मित्राच्या घरी असताना पोलिसांनी त्याला अटक केली होती. (PC-BCCI Photo)

2 / 6
आयपीएल 2013 स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थानचा अजीत चंडिला याला तुरुंगवास भोगावा लागला होता. त्याला श्रीसंतसह स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पकडलं होतं. त्यामुळे त्याचं क्रिकेट करिअर संपलं आणि मैदानात पुनरागमन झालंच नाही. पोलिसांनी त्याला दिल्लीच्या हॉटेलमधून अटक केली होती. (PC-AFP Photo)

3 / 6
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राजस्थानच्या अंकित चव्हाणलाही जेलमध्ये जावं लागलं होतं. त्याच्यावरही स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता. पोलिसांनी त्याला दिल्लीच्या हॉटेलमधून अटक केली होती. अजीतसारखंच अंकित करिअर यामुळे संपुष्टात आलं होतं. (PC-BCCI Photo)

4 / 6
आयपीएल 2012 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एका खेळाडूला तुरुंगवास भोगावा लागला होता. ऑस्ट्रेलियन खेळाडू ल्यूक पोमरबाच याच्यावर अमेरिकन महिलेवर जबरदस्ती आणि मारहाण केल्याचा आरोप होता. इतकंच काय तर तिच्या प्रियकरालाही मारहाण केली होती. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. गुन्हा कबूल केल्यानंतर त्या महिलेने केस मागे घेतली. (PC-AFP Photo)

5 / 6
भारताचा माजी खेळाडू राहुल शर्मा यालाही आयपीएल 2012 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. राहुल त्यावेळी पुणे वॉरियर्स संघाकडून खेळत होता. त्याच्यावर रेव्ह पार्टीत सहभागी असल्याचा आरोप होता.त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेच्या वेन पार्नेलला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. (PC-BCCI Photo)

6 / 6
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....