‘या’ उपायांचा वापर करून दूर करा स्ट्रेच मार्क्स
शरीराची त्वचा ताणली गेल्यामुळे स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात. वजन आणि मासपेशी यांचं प्रमाण अचानक वाढल्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात स्ट्रेच मार्क्स येतात. लाल, पांढऱ्या रंगाच्या रेषा या शरीरावर दिसतात. त्यामुळे त्वचा खराब दिसायला लागते. हे स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया.
1 / 7
स्ट्रेच मार्क्स हे गर्भवती महिलांना येतात, असा समज असतो. पण स्ट्रेच मार्क्स हे स्त्री, पुरूष कोणाच्याह शरीरावर येऊ शकतात. वाढलेले किंवा कमी झालेले वजन, हे स्ट्रेच मार्क्सचे प्रमुख कारण. त्यामुळे त्वचा ताणली जाऊन त्यावर मार्क्स म्हणजेच व्रण पडतात. स्ट्रेच मार्क्स हे पोट, कंबर आणि मांड्यांवर येतात. ते दूर करण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात.
2 / 7
नारळाचे तेल - नारळाच्या तेलाचा वापर करून स्ट्रेच मार्क्स दूर करता येऊ शकतात. हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स घालवायचे असतील तर नारळाच्या तेलाने नियमित मालिश करावे.
3 / 7
काकडी व लिंबू - स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी काकडी व लिंबाचा वापरही गुणकारी ठरू शकतो. यासाठी काकडी किसून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळावा व पेस्ट तयार करावी. शरीराच्या ज्या भागावर स्ट्रेच मार्क्स आहेत, तेथे ही पेस्ट काही काळ लावावी. थोड्या वेळाने तो भाग स्वच्छ करून पाण्याने धुवून टाकावा.
4 / 7
अंडं व व्हिटॅमिन ई - यासाठी एक अंड बाऊलमध्ये फोडून घ्या व त्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. हे मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावावे. वाळल्यानंतर प्रभावित भाग पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करावा.
5 / 7
6 / 7
बटाट्याचा रस - बटाट्याचा वापर करूनही स्ट्रेच मार्क्स दूर करता येतात. त्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून त्याचे साल काढून ते किसून घ्यावेत. बटाट्याचा रस स्ट्रेच मार्क्सवर लावावा, वाळल्यानंतर पुसून टाकावा व प्रभावित जागा पाण्याने स्वच्छ धुवावी.
7 / 7
बदाम व ऑलिव्ह ऑईल - ऑलिव्ह ऑईल आणि बदामाचे तेल एकत्र करून ते स्ट्रेच मार्क्सवर लावल्यास स्ट्रेच मार्क्सची समस्या दूर होण्यास मदत होईल. नियमित वाराने फरक दिसून येईल.