एकटीने प्रवास करताना महिला सुरक्षेच्या दृष्टीने नेहमी चिंतित असतात. अशा वेळी बॅगेत काही सेफ्टी टूल्स असतील तर त्या स्वत:ची सुरक्षा करू शकतात.
कार्यालयीन कामांसाठी किंवा इतर दैनंदिन कामांसाठी कात्रीचा वापर सामान्य आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हातातील पर्समध्ये कात्रीही सोबत ठेवू शकता. याच्या मदतीने सुरक्षितताही सुनिश्चित करू शकता.
महिलांच्या रोजच्या दिनचर्येत सेफ्टी पिनचा वापर सर्रास केला जातो. सहसा महिला ड्रेससाठी सेफ्टी पिनची मदत घेतात. परंतु सेफ्टी पिन हे तुमच्यासाठी सर्वोत्तम सुरक्षा साधन देखील सिद्ध होऊ शकते. हल्लेखोराला पिन टोचून तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकता.
सुरक्षेसाठी महिला त्यांच्या बॅगेत नेल कटर किंवा चाकू ठेवू शकतात. विशेषत: स्विस नाईफ असणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ज्याच्या मदतीने तुम्ही हल्लेखोराला ताबडतोब प्रत्युत्तर देऊ शकता.
एकट्याने प्रवास करताना, किल्ली वापरून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. हल्लेखोर हल्ला करताच तुम्ही चावीच्या तीक्ष्ण भागाच्या मदतीने त्वरीत प्रतिक्रिया देऊ शकता