रोल्स-रॉयसने (Rolls-Royce) जगातील सर्वात महागडी कार लाँच केली आहे. या कारची किंमत £20 Million (सुमारे 206 कोटी रुपये) इतकी आहे.
जगातील सर्वात महागडी कार रोल्स-रॉयस बोट टेल एक नॉटिकल-थीमवाली लक्झरी कार आहे, ज्यामध्ये रियर डेक आहे जो पिकनिक सेटमध्ये बदलता येतो.
कारच्या रियर डेकमध्ये एक डिनर सेट, मॅचिंग खुर्च्यांसह कॉकटेल टेबल आणि एक छत्री आहे, जी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ओपन करु शकता.
ब्रिटिश कार निर्माता कंपनीने या कारची केबिन शानदार डिझाईन केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, या कारच्या डिझाईन आणि डेव्हलपमेंटसाठी चार वर्ष लागली होती.
कारची किंमत इतकी जास्त आहे कारण ही कार जवळजवळ सर्वोत्तम लेव्हलपर्यत इंजिनियर्ड आणि डिझाईन केली आहे.
5.8 मीटर लांब कारचं मागील बाजूस असलेलं डेक फुलपाखराच्या पंखांप्रमाणे उघडतं. यात शानदार वस्तूंसाठी अंडर-कव्हर स्टोरेज स्पेस मिळेल.