येत्या 31 डिसेंबरला मुंबईतील वरळी परिसरात कोरोनारुपी राक्षसाचे दहन केले जाणार आहे.
मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर वरळी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा मृत्यू झाला.
तसेच 2020 मध्ये कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले.
त्यामुळे यंदा कोरोनारुपी राक्षसाचे दहन करण्याचा संकल्प वरळीकरांनी केला आहे.