उष्ट्रासन सुरुवातीला वज्रासनात म्हणजे पाय गुडघ्यातून दुमडून बसावे. त्यानंतर गुडघ्यांवर उभे राहावे. साहजिकच पाय मागे रहातील. आता दोन्ही हात समोर न्यावेत. त्यानंतर हात कानावरून मागे घ्यावेत. शरीराचा पुढील भाग हळूहळू मागे झुकविण्याचा प्रयत्न करावा. मग हातही पूर्णपणे मागे न्यावेत. आता हातांनी टाच पकडण्याचा प्रयत्न करावा. मानही मागे वळवावी आणि डोकेही मागे न्यावे. या अवस्थेत शरीर मागच्या बाजूला झुकलेले असेल. ही आसनाची पूर्ण स्थिती आहे. क्षमतेनुसार आसनात राहावे. ही मुद्रा रक्ताभिसरण सुधारते. दम्याच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा.