वेट लॉसपासून ते स्ट्रेस कमी करण्यापर्यंत… हर्बल टी पिण्याचे आहेत असंख्य फायदे

| Updated on: Jan 25, 2023 | 10:34 AM

हर्बल टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तो औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्यामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.

1 / 5
आजकाल हर्बल टीची खूप चर्चा आहे. हर्बल टी हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तो अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो, त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्ही कोणता हर्बल टी किंवा हर्बल चहा पिऊ शकता आणि त्याचे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया.

2 / 5
 हळद हे सुपरफूड आहे. यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. तुम्ही हळदीचा चहा देखील पिऊ शकता. हे कॅफीन मुक्त पेय आहे. त्यामुळे मेटाबॉलिज्म वेगवान होण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यास मदत करते. हळदीचा चहा प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

3 / 5
कॅमोमाईल टी - कॅमोमाइल चहा प्यायल्यानंतर आपल्याला खूप आराम वाटतो. ज्या लोकांना झोपेचा त्रास होतो, ते रात्री झोपण्यापूर्वी हा चहा पिऊ शकतात. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

4 / 5
हिबिस्कस टी - हर्बल टी प्यायल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे यकृत निरोगी राहते. हे जलद वजन कमी करण्यास मदत करते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आणि औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आहेत.

5 / 5
 जिंजर टी - आल्याचा चहा सर्वांनाच प्यायला आवडतो. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात आल्याचा चहा प्यायल्याने छान वाटतं. आल्याचा चहा प्यायल्याने सर्दी आणि फ्लूपासून आराम मिळू शकतो.  तसेच तो डोकेदुखीपासून त्वरित आराम देण्याचे काम करतो. आल्यामधील औषधी गुणधर्मांमुळे हंगामी आजारांपासून आराम मिळतो.