हीट स्टाइलिंग टूल्स, कर्लिंग टूल्स, आणि ब्लो ड्रायर्स, यांच्या वापरामुळे केसांच्या क्यूटिकलला इजा होऊ शकते. त्यामुळे केस दुभंगतात. हे टाळायचे असेल तर अशा उपकरणांचा वापर कमी करा.
ओले केस कमकुवत असतात, आणि ते तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुमचे केस ओले असताना टॉवेलने जोरात झटकणे किंवा कंगव्याने विंचरणे टाळा. कॉटनच्या टॉवेलने हलक्या हाताने केस पुसावेत आणि वाळवावेत.
स्प्लिट एन्ड्स टाळण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे केस नियमित ट्रिम करणे. स्प्लिट एंड्स कमी करण्यासाठी आणि केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दर 6 ते 8 आठवड्यांनी तुमचे केस ट्रिम करा. यामुळे तुमचे केस वाढण्यासही मदत होईल.
बायोटिन, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा -3 फॅटी ॲसिडस् यांसारख्या व्हिटॅमिन आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या पदार्थांच्या सेवनाने केसांचे आरोग्य चांगले राहते. केस आणि स्काल्प हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे केसांचे संरक्षण होईल.
खोबरेल तेलाने नियमिच मसाज केल्यास केस खूप मऊ आणि मॉयश्चराइज राहतात. खरं तर, केस दुभंगणे थांबवायचे असेल तर खोबरलेचा नियमित वापर उत्तम घरगुती उपाय ठरतो. चांगला रिझल्ट हवा असेल तर तेल थोडं कोमट करून नियमित लावावे. फरक दिसून येईल.