होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून बाजारात विविध रंग, पिचकाऱ्या यांची रंगत दिसत आहे. मात्र त्या रंगामधील हानिकारक घटकांमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तुम्ही घरच्या घरी सहज ऑर्गॅनिक रंग बनवून त्यांचा होळी खेळण्यासाठी वापर करू शकता. (फोटो : Freepik)
हळदीसह झेंडूची फुले एकत्र वाटून तुम्ही पिवळा रंग तयार करू शकता. (फोटो : Freepik)
बीट, डाळिंब, गाजर,टोमॅटो हे सर्व एकत्र वाटून तुम्ही लिक्विड रंगही बनवू त्याने होळीचा आनंद लुटू शकता. (फोटो : Freepik)
गुलाबाच्या पाकळ्या आणि चंदन हे एकत्र करून गुलाल तयार करू शकता. (फोटो : Freepik)
चंदन पावडर आणि पलाश याची फुलं एकत्र करून नारिंगी रंग बनवू शकता. (फोटो : Freepik)