
भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्माचा सोशल मीडियावर नेहमीच जलवा पाहायला मिळतो. कधी विविध बिचेसवरचे बिकिनीतले फोटो तर कधी घरातूनच साजश्रृंगार करुन अगदी पारंपारिक पद्धतीने काढलेले फोटो असोत, तिच्या फॅन्सला तिचे फोटो खूप आवडतात.

ती ज्या पद्धतीने आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, ते पाहून ती कोणत्या अभिनेत्रीपेक्षा नक्कीच कमी नाहीय, अशा कमेंट तिचे फॅन्स करत असतात. भरीस भर म्हणजे ती दिसायला तर सुंदर आहेच त्याहूनही सुंदर ती डान्स करते.

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. तिने अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केलाय. तिचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यांनी एकमेकांना समजून घेतलं. लॉकडाऊनच्या काळात दोघंही विवाहबंधनात अडकले. भल्याभल्यांची विकेट घेणारा युजवेंद्रची विकेट धनश्रीने घेतलीय.

धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांच्या आसपास फॉलोवर्स आहेत तर युट्यूबवर जवळपास 25 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.