झहीर खानचा आज वाढदिवस आहे, तो आज 44 वर्षांचा झाला. त्याने टीम इंडियाला अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले आहेत. त्याचं खासगी आयुष्य सुद्धा अनेकदा चर्चेत राहिलं आहे. त्याचं लव्हमॅसेज झालं, तेही फिल्मीस्टाईलने...
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सागरिका घाटगे हीच्यासोबत झहीर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. सागरिका आणि झहीर एका पार्टीमध्ये भेटले होते. तिथं त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर अनेकवर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं आहे.
ज्यावेळी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, झहीर मुस्लीम आणि सागरिका हिंदू असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ज्यावेळी सागरिकाने तिच्या कुटुंबियांना झहीरला भेटवलं. त्यावेळी झहीर चांगलं मराठी बोलतं असल्याचं पाहून सागरिकाचे घरचे एकदम खूश झाले होते.
दोघांच्या कुटुंबियांना सहमती दिल्यानंतर 2017 मध्ये झहीरने आणि सागरिकाने नोव्हेंबर महिन्यात लग्न केले.