महागाईपासून शिवसेनाप्रमुख पदापर्यंत… उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 10 तडाखेबंद मुद्दे
द्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई : शिवतीर्थावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेत गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रिपदं तुमच्या बुडाला चिटकली आहे. काही काळापुरती आहे.पण गद्दारीचा हा शिक्का या जन्मी तरी पुसणार नाही, गद्दारच. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली.
महागाईपासून शिवसेनाप्रमुख पदापर्यंत… उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 10 तडाखेबंद मुद्दे
- यावेळचा रावण वेगळा आहे., काळ बदलतो तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता किती झाला… डोक्यांचा नाही खोक्यांचा. पन्नास खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. धोकासूर आहे.
- माझी बोटं हालत नव्हती. शरीर निश्चल पडलं होतं. ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा. कट करणारे अप्पा म्हणजे कटाप्पा. हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. आपल्यासमोर येऊच शकणार नाही. हा उद्धव ठाकरे नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे त्यांना माहीत नाही.
- मंत्रीपद, आमदार खासदारकी दिली. ज्यांना दिलं ते नाराज होऊन गेले. ज्यांना दिलं नाही. ते माझ्यासोबत आहेत. हे माझं नशीब आहे. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसेनेची आहे. जोपर्यंत सोबत आहात. तोपर्यंत मी पक्षप्रमुख राहणार.
- मी का मुख्यमंत्री झालो. का केली आघाडी. ही लपून ठेवण्याची गोष्ट नाही. भाजपने पाठीत वार केला. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली.
- भाजप-सेनेचा अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं. हे आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो.
- इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिलं. आमदार केलं. मंत्री केलं. आता मुख्यमंत्री झाला. तरी शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं आहे. शिवसेनाप्रमुख स्वीकारणार का त्याला
- स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा होता.
- आनंद दिघे एकनिष्ठ शिवसैनिकाला जाऊन २० वर्ष झाली. आज त्यांची आठवण आली. ते एकनिष्ठ होते. जाताना ते भगव्यातून गेले.
- मोहन भागवत मशिदीत गेले होते. कशासाठी गेले होते. त्यांनी हिंदुत्व सोडलं का?
- बिल्किस बानू. ती गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या नातेवाईकांना मारलं. आरोपी पकडले. पण भाजप सरकारने त्यांना सोडलं. आरोपींचा सत्कार केला. तुमच्या पक्षात या गोष्टी घडत असेल. तुमच्या अनुयायांकडून या गोष्टी घडत असतील तर कुणाकडून अपेक्षा करायची?