अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?; बच्चू कडू यांच्या दाव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले?

शहाजीबापू पाटील म्हणाले, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटूही शकतात.

अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?; बच्चू कडू यांच्या दाव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले?
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 11:37 PM

मुंबई : येत्या अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे 10 ते 12 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी चिमटा काढलाय. बच्चू कडूंचा दावा नेमका काय आहे?. जे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत, त्या बच्चू कडूंनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय. इतर पक्षातल्या 10 ते 12 आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. इतर पक्षातले काही आमदार आहेत. त्यांचाही पक्षप्रवेश कदाचित होऊ शकतो. तारखेवर तारीख येत आहे. त्याचं कारण एक तर कोर्ट आणि दुसरं कारण पक्षप्रवेश…10 ते 15 आमदार बऱ्य़ापैकी राहिलेल्या पक्षामधले फुटतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

15 आमदार अधिवेशनाआधी फुटणार

बच्चू कडूंनी आमदार फुटणार असल्याचा दावा केला असला तरी कुठल्या पक्षाचे आमदार फुटणार हे मात्र गुपीत ठेवलंय. आत्ताच याबाबत गौप्यस्फोट करु इच्छित नसल्याचं त्यांनी सांगितलंय. कुठल्या पक्षातले फुटतील ते मला स्पष्ट सांगता येणार नाही. हे गोपनीय आहे. तुम्हाला मोघमपणे सांगू शकतो. हेच फुटणार, याच पक्षाचे फुटणार हे नाही सांगू शकत. पण मला वाटतं 10 ते 15 आमदार अधिवेशनाआधी फुटणार, असंही बच्चू कडू म्हणाले.

शहाजीबापू पाटील यांनी दिला दुजोरा

यावर संजय राऊत म्हणाले, स्वत: बच्चू कडू पण करतायत का? बघा कोण काय बोलतंय. त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. बहुतेक मला माहिती आहे. भाजपचे काही आमदार प्रवेश करतायत. बच्चू कडू यांची माहिती बरोबर आहे. बच्चू कडूंच्या दाव्याला शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनीही दुजोरा दिलाय.

शहाजीबापू पाटील म्हणाले, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटूही शकतात.

बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाच्या दाव्याला सहा महिन्यांचा कालावधी

जयंत पाटील म्हणाले, मला काहीही कल्पना नाही. बच्चू कडू काय म्हणाले त्याबद्दल मला कल्पना नाही. बच्चू कडूंनी आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा करुन 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालाय. त्यांचं हे स्वप्न अद्याप तरी पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं त्यांनी केलेल्या नव्या दाव्यावर संजय राऊत यांनी चांगलाच चिमटा घेतलाय.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.