सेलिब्रेशन लोकशाहीचं, कर्तव्य मतदानाचं, स्वातंत्र्यापासून मतदान करणाऱ्या 102 वर्षांच्या आजीबाई
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका 102 वर्षीय आजीबाईंनीही लोकशाहीचा हा महोत्सव सेलिब्रेट केला. किसाबाई रामजी पाटील (Kisabai Ramji Patil) यांनी त्यांच्या गिरगाव या गावात मतदानाचा हक्क बजावला.
Maharashtra Voting कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान ( Maharashtra Voting) होत आहे. मोठी शहरं वगळता बहुतेक जिल्ह्यांत मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण लोकशाहीच्या या महासोहळ्यात सहभागी होऊन, आपलं मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका 102 वर्षीय आजीबाईंनीही लोकशाहीचा हा महोत्सव सेलिब्रेट केला. किसाबाई रामजी पाटील (Kisabai Ramji Patil) यांनी त्यांच्या गिरगाव या गावात मतदानाचा हक्क बजावला. किसाबाई यांनी स्वातंत्र्यापासून बहुतेक सर्व निवडणुकांमध्ये मतदान केलं आहे. काठीचा आधार घेत त्यांनी आज महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान केलं.
“माझं नाव किसाबाई रामजी पाटील, वय 102, 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून मतदान करते” असं त्यांनी सांगितलं. किसाबाई यांच्यासारख्या अनेकांनी आज मतदान करुन, लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं कर्तव्य पार पाडलं.