भाजपमध्ये येण्यासाठी काँग्रेसचे 20 आमदार आजही तयार : येडियुरप्पा
बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे 20 आमदार भाजपमध्ये यायला तयार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे आमदार केव्हाही भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही त्यांनी नमूद केले. येडियुरप्पा म्हणाले, “कर्नाटकच्या आत्ताच्या सरकारवर काँग्रेसचे 20 पेक्षा अधिक आमदार नाराज आहेत. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊ शकतात. […]
बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे 20 आमदार भाजपमध्ये यायला तयार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे आमदार केव्हाही भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही त्यांनी नमूद केले.
येडियुरप्पा म्हणाले, “कर्नाटकच्या आत्ताच्या सरकारवर काँग्रेसचे 20 पेक्षा अधिक आमदार नाराज आहेत. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊ शकतात. थोडी वाट पाहा, लवकरच परिणाम दिसेल.”
दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाने 2018 मध्ये युतीचे सरकार स्थापन केले. मात्र, सुरुवातीपासूनच सरकारच्या स्थिरतेवर पक्षफुटीची टांगती तलवार आहे. आता तर भाजपचे वरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी दावा केला आहे, की सरकारवर नाराज असलेले 20 पेक्षा अधिक आमदार भाजपमध्ये सहभागी होण्यास तयार आहेत.
काय आहे येडियुरप्पा यांचा सरकार स्थापनेचं गणित?
कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या एकूण 224 आहे. भाजपकडे सद्यस्थितीत 104 आमदार आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीनंतर भाजपची संख्या 106 झाली. त्यांना आणखी 7 आमदारांची गरज आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांना काँग्रेसचे आणखी 7 आमदार जरी फोडता आले, तरी भाजप सत्ता स्थापनेचा दावा करु शकेल. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकिहोली यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यांच्या भाजप नेत्यांशी झालेल्या भेटीही समोर आल्या आहेत. भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर जारकिहोली यांनी 23 मे नंतर काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी 4 के 5 काँग्रेस आमदार राजीनामा देतील आणि या ठिकाणांवर पोटनिवडणुका होतील. अद्यापही विधानसभेच्या 2 जागा रिक्त आहेत. त्यामुळे येडियुरप्पांचा दावा खरा ठरणार की काँग्रेस-जेडीएस पक्षातील फुट थांबवत सत्ता राखणार हे 23 मे रोजी लोकसभा निकालानंतरच स्पष्ट होईल.