Sudhir Mungantiwar : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृताच्या कुटुंबीयांना मिळणार 20 लाख रुपये; मुनगंटीवारांची विधानसभेत घोषणा
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात (wild animals Attack) मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आता 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत (Monsoon session) महत्त्वाची घोषणा केली आहे.
चंद्रपूर : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात (wild animals Attack) मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आता 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत (Monsoon session) महत्त्वाची घोषणा केली आहे. पूर्व वन्यप्राण्याच्या हल्ल्यांमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपये इतकी आर्थिक मदत मिळत होती. मात्र आता ही मदत पाच लाख रुपयांनी वाढून वीस लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत घोषणा केलीये. नव्या निर्णयानुसार वाघ, बिबटया, रानडुक्कर, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा, हत्ती व रानडुकरे यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम आता 15 लाखांहून 20 लाख इतकी करण्यात आली आहे.
मृतांची संख्या वाढली
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे दिसून येते. 2019-20 या वर्षात वन्यप्राण्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या 47 इतकी होती. 2020- 21 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये एकूण 80 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2021-2022 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण 86 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या व्यक्तींचा मृत्यू हा वाघ, बिबटया, रानडुक्कर, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा, हत्ती व रानडुक्कर या सारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होईल त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आता 15 लाखांऐवजी 20 लाखांची मदत मिळेल अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली आहे.
वन्यप्राणी आणि मानवाचा वाढता संघर्ष
गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राणी आणि मानवामध्ये संघर्ष वाढल्याचे दिसून येत आहे. बिबट्या गावात घुसल्याचे किंवा अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात दिसल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. बिबट्याप्रमाणेच रान गव्याचा कळप आणि हरणांच्या कळपाचा मुक्तसंचार गावात आणि अनेकदा शहरात देखील पहायला मिळाला आहे. अनेकदा हे वन्यप्राणी मानवावर हल्ले करतात. या हल्ल्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या अधिवासात मनुष्याकडून वाढत असलेल्या अतिक्रमनामुळे देखील हा संघर्ष आणखी तीव्र होत आहे.