कोल्हापूर – सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणार भाषण कालचं राज ठाकरेंचं (Raj Thackeray) भाषण होतं. मी धर्माध नाही पण धर्माभिमानी आहे हे त्यांचं वाक्य आवडलं असंही चंद्रकांत पाटील कोल्हापूरात (Kolhapur) पत्रकार परिषदेत बोलत असताना म्हणाले. हिंदू या शब्दात सर्व धर्म समभाव आहे. हिंदू म्हणजे बुरसटलेला असं चित्र निर्माण केलं गेल आहे. कालच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांची आठवण झाली. फक्त आम्ही एकटे विश्वासघात झाला असे म्हणत होतो. जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सगळं जे सांभाळायच आहे.
कोल्हापूर मधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही
कोल्हापूर मधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही; असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याची टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आज रुईकर कॉलनी येथे कॉफी पे चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपा उमेदवार सत्यजित कदम, सहसेवा ट्रस्टचे अध्यक्ष सन्मति मिरजे यांच्या सह भागातील नागरिक उपस्थित होते.
पुढच्या दिवाळीला कोल्हापुरकरांची अंघोळ थेट पाइपलाइन द्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याने घालू
कोल्हापुरकरांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवले. हे दाखवताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली होती की, पुढच्या दिवाळीला कोल्हापुरकरांची अंघोळ थेट पाइपलाइन द्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याने घालू. पण मुळात थेट पाइपलाईनचे पाणी पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असल्याची टीकाही चंद्रकात पाटलांनी यावेळी केली.
यापूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचे दमन केले जात होते
ते पुढे म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण जगात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांनी हिंदुंचे मानबिंदू पुनर्स्थापित करुन, हिंदूंना प्रतिष्ठा मिळवून दिली. यापूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचे दमन केले जात होते. तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींच्या घरात धार्मिक पूजाअर्चाचे अतिशय कटाक्षाने पालन होत होते. पण इतरांना मात्र हिंदुंना धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पूजाअर्चनेला मज्जाव केला जात होता. त्यामुळे या ढोंगी लोकांपासून माननीय मोदीजींनी सर्वांना मुक्त करुन, त्यांना आपली आराधना करण्याचे स्वतंत्र्य मिळवून दिले आहे.