नवी दिल्ली: गुजरात दंगली (Gujarat riots) प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप पुसले गेल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना अमित शाह यांनी म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाकडून नरेंद्र मोदी यांना क्लिन चीट देण्यात आल्याने आता सर्व आरोप पुसले गेले आहेत. ही दंगल सुनियोजित नव्हती तर स्वयंप्रेरीत होती असं कोर्टाने हा निकाल देताना म्हटले आहे. मात्र या दंगलीला कायमच राजकीय चष्म्यातून पाहिलं गेलं. या प्रकरणात अनेक खोटे आरोप करण्यात आले, ज्यांनी असे खोट आरोप केले त्यांनी आता या निर्णयानंतर माफी मागावी.
यावेळी बोलताना अमित शाह यांनी म्हटले आहे की, दंगल घडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी हा निकाल आला आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानं मोदींचे सगळे आरोप पुसले गेलेत. यामुळे भाजप सरकारवर जो डाग लागला होता तोही पुसला गेलाय. मोदींसारख्या वैश्विव नेत्याबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय हा मोठा आहे. या प्रकरणात मोदींची चौकशी झाली मला अटक झाली, मात्र आम्ही कायदा पाळला. शेवटी आज सत्य बाहेर आलंच. आता हे सत्य सोन्यापेक्षाही जास्त चमकत आहे. या काळात विरोधकांकडून वारंवार खोटे आरोप करण्यात आले. त्यामुळे आता विरोधकांनी माफी मागावी.
#WATCH LIVE | HM Amit Shah breaks his silence on what happened during the 2002 Gujarat riots. An interview with ANI Editor Smita Prakash. https://t.co/qkX9eAYeG6
— ANI (@ANI) June 25, 2022
गुजरात दंगल सरकारने घडवल्याचा आरोप होता. या प्रकरणात गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात क्लिन चीट दिली आहे. दंगल सुनियोजित नव्हती, स्वयंप्रेरीत होती असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे गुजरात दंगलीतील सर्व आरोप पुसले गेले आहेत. राजकारणात आयडिओलॉजी घेऊन आलेल्या पत्रकारांनी, एनजीओंनी आणि विरोधकांनी या प्रकरणात खोटी माहिती खरी दाखवण्याचा प्रयत्न केला. मीडियामध्ये देखील तशाच बातम्या चालल्या, मात्र तेव्हाही कधी आम्ही मिडीयामध्ये हस्तक्षेप केला नाही, ना आज करतोय असे अमित शाह यांनी म्हटले आहे.