भाजपच्या ‘या’ उमेदवारावर 10-20 नव्हे, तर तब्बल 242 गुन्हे

तिरुअनंतपुरम (केरळ) : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. दोन टप्प्यातील मतदानही पार पडलं आहे. कुठे प्रचारसभा, तर कुठे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेकडोंच्या संख्येत रॅली पाहायला मिळत आहे. यादरम्यान उमेदवारांच्या अर्ज भरताना सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्राचंही विशेष कुतुहल लोकांमध्ये असतं. कारण यातून उमेदवाराच्या संपत्तीची, गाड्या-बंगल्याची, शिक्षणाची, त्याच्यावरील गुन्ह्यांची माहिती समोर येते. केरळमधील भाजप उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली […]

भाजपच्या 'या' उमेदवारावर 10-20 नव्हे, तर तब्बल 242 गुन्हे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

तिरुअनंतपुरम (केरळ) : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. दोन टप्प्यातील मतदानही पार पडलं आहे. कुठे प्रचारसभा, तर कुठे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेकडोंच्या संख्येत रॅली पाहायला मिळत आहे. यादरम्यान उमेदवारांच्या अर्ज भरताना सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्राचंही विशेष कुतुहल लोकांमध्ये असतं. कारण यातून उमेदवाराच्या संपत्तीची, गाड्या-बंगल्याची, शिक्षणाची, त्याच्यावरील गुन्ह्यांची माहिती समोर येते. केरळमधील भाजप उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. सुरेंद्रन असे या उमेदवाराचे नाव आहे.

केरळच्या पतनमथिट्टा लोकसभा जागेवरुन भाजपचे उमेदवार सुरेंद्रन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुरेंद्रन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, त्यांच्यावर दहा-बारा नव्हे, तर तब्बल 242 गुन्हे दाखल आहेत.

विशेष म्हणजे, यामधील 222 गुन्हे हे फक्त दोन दिवसात दाखल झालेले आहेत. सुरेंद्र यांच्या विरोधात 2 आणि 3 जानेवारीला 222 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिरुवनंतपुरम, कासरगोड आणि पतनमथिट्टा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल केले आहेत. सुरेंद्रनेही निवडणूक आयोगाच्या शपथपत्रात 164 गुन्ह्यांची माहिती दिली आहे. सध्या 242 गुन्हे असल्यामुळे संपूर्ण देशात सुरेंद्रन चर्चेचा विषय बनले आहेत.

केरळच्या पतनमथिट्टा लोकसभा जागेवरुन भाजपचे उमेदवार सुरेंद्रन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथे 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. सुरेंद्रन यांना आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी लागली. भाजप पुरस्कृत जन्मभूमी वृत्तपत्रात तशी माहिती छापलीही गेली. सुरेंद्रन यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती छापण्यासाठी वृत्तपत्राची तब्बल चार पाने खर्ची घालावी लागली. तर टीव्हीवर जाहिरात देण्यासाठी 60 सेकंदांचा वेळ लागला.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तीन वेळा प्रत्येक उमेदवाराला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये आपल्या गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक आहे.

भाजप उमेदवार सुरेंद्रन उभे असलेल्या मतदारसंघात आठ उमेदवार आहेत. काँग्रेसकडून अँटो अँटोनियो, माकपकडून वीना जॉर्ज, बहुजन समाज पक्षाने शिबू पाराक्कडवन, आंबेडकर पार्टी ऑफ इंडियाने जोश जॉर्ज आणि सोशलिस्ट यूनिटी ऑफ इंडियाने बिनू बेबी यांना तिकिट दिलं आहे, तर इतर काही स्वतंत्र उमेदवार उभे आहेत.

दरम्यान, सुरेंद्रन यांचे नाव सबरीमाला आंदोलनादरम्यान चर्चेत आले होते. आंदोलना दरम्यान सुरेंद्रनला 22 दिवस तुरुंगात जावं लागलं होतं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.