Ravikant Tupkar : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून 125 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रविकांत तुपकर यांचा आरोप
कांद्याचा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आतहत्येचा विचार करीत आहेत. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना समजून घ्यायला हवे.
मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाणं वाढलं आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होत. परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आत्तापर्यंत 150 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers suicide) केली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी भाजपलासोबत घेऊन नवं मंत्रीमंडळ स्थापण केलं. परंतु आता त्यांच्या पुढे अडचणी वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण शिवसेना आणि शिंदे गट कोर्टात दाखल झाले आहेत. सोमवारी निकाल कुणाच्या बाजूने लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
रस्त्यावर उतरण्याचा शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला इशारा
राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याच्या निषेधार्थ काल मोर्चा काढण्यात आला होता. पुणे नाशिक हायवेवरती संघटनेच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. विशेष म्हणजे त्यावेळी शेतकऱ्यांनी कांदा गळ्यात घालून आंदोलन केले. त्यावेळी राज्यातील अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. सध्याच्या महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलन करण्यापुर्वी शेतकऱ्यांना रविकांत तुपकर यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष करीत आहेत. तात्काळ कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर करावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील दिला आहे.
शेतकरी आत्महत्येचा विचार करीत आहेत
कांद्याचा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आतहत्येचा विचार करीत आहेत. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना समजून घ्यायला हवे. त्याचबरोबर त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करायला हवे, असे मत प्रभाकर बांगर यांनी व्यक्त केले.