राजस्थानमध्ये 28 वर्षांपासूनची परंपरा यावेळीही कायम

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. मध्य प्रदेशमध्ये अटीतटीची लढत सुरु आहे. पण इथे अपक्ष आणि छोट्या पक्षांची निर्णायक भूमिका असेल. राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारुन आज बरोबर एक वर्ष झालंय, नेमकं याच दिवशी […]

राजस्थानमध्ये 28 वर्षांपासूनची परंपरा यावेळीही कायम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. मध्य प्रदेशमध्ये अटीतटीची लढत सुरु आहे. पण इथे अपक्ष आणि छोट्या पक्षांची निर्णायक भूमिका असेल. राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारुन आज बरोबर एक वर्ष झालंय, नेमकं याच दिवशी काँग्रेसने त्यांना भेट म्हणून दोन राज्यातली सत्ता दिली आहे. याशिवाय राजस्थानमध्ये गेल्या 28 वर्षांची परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली.

राजस्थानच्या या 28 वर्षांच्या परंपरेची सुरुवात होते ती 1990 पासून. भैरोसिंग शेखावत हे पहिलेच बिगर काँग्रेस मुख्यमंत्री बनले. या पदावर ते 1992 पर्यंत राहिले आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागली. पुन्हा 4 नोव्हेंबर 1993 ला शेखावत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ते 29 नोव्हेंबर 1998 पर्यंत मुख्यमंत्री होते.

निवडणूक आली आणि पुन्हा एकदा राजस्थानमधील सत्तांतर झालं. 1 डिसेंबर 1998 रोजी काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 8 डिसेंबर 2003 पर्यंत अशोक गहलोत मुख्यमंत्री होते. राजस्थानमधील सत्तांतराचा ट्रेंड कायम राहिला आणि 2003 ला पुन्हा भाजपचं सरकार आलं. वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

पाच वर्षात पुन्हा एकदा भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेत आली. अशोक गहलोत यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2013 ला यूपीए सरकारविरोधातील रोष वाढला होता आणि मोदी लाट सुरु झाली होती. या वेळीच पुन्हा एकदा राजस्थानमध्ये सत्तांतर झालं आणि वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या.

2018 च्या निवडणुकीत राजस्थानच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसला संधी आहे. अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे दोघे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. वसुंधरा राजेंनी सत्ता गमावली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सत्ताबदलाची ही परंपरा 28 वर्षांपासून कायम आहे.

राजस्थानमध्ये सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता

राजस्थानमध्ये स्वातंत्र्यानंतर 1951 ते 1990 या 40 वर्षांच्या काळात तीन वर्ष वगळले तर फक्त काँग्रेसची सत्ता होती. 22 जून 1977 ला भैरोसिंग शेखावत यांचं जनता दल सरकार सत्तेत आलं, पण हे सरकार तीन वर्षांच्या आतच बरखास्त झालं आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर 1980 मध्ये जगन्नाथ पहाडिया हे काँग्रेसचे नवे मुख्यमंत्री झाले आणि सलग दहा वर्ष काँग्रेसचीच सत्ता राहिली.

काँग्रेसच्या राजकारणातील आणखी एक घडामोड म्हणजे ज्या-ज्या वेळी बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री झाला, त्यानंतर काही वर्षातच राष्ट्रपती राजवट लागू झालेली पाहायला मिळते. 1992 सालीही भैरोसिंग शेखावत मुख्यमंत्री असताना हाच प्रकार घडला होता. यानंतर नव्याने निवडणूक लागली आणि काँग्रेसची सत्ता आली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.