ओबीसी विभागासाठी प्रथमच भरीव तरतूद, पहा कोणत्या योजनेसाठी किती पैसे मिळाले ?

नागपूर विधीमंडळ अधिवेशनात इतर मागासवर्गीयांच्या विविध योजनांसाठी यंदा प्रथमच विक्रमी तरदूत झाली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी पुरवणी मागण्याद्वारे ही भरीव तरतूद करण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने ही तरतूद करण्यात आली आहे.

ओबीसी विभागासाठी प्रथमच भरीव तरतूद, पहा कोणत्या योजनेसाठी किती पैसे मिळाले ?
minster atul save
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 6:08 PM

विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर | 13 डिसेंबर 2023 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी 3377 कोटीच्या पुरवणी मागण्यांना मंजूरी मिळाली आहे. या ओबीसी विभागासाठीच्या योजनांसाठी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पुढाकार घेतला होता. ओबीसी विभाग स्थापण झाल्यानंतर एका वर्षांसाठी झालेली ही विक्रमी तरतूद असल्याचे म्हटले जात आहे. गेल्यावर्षी पेक्षा ही तरदूत 3081 कोटी रुपयेअधिक आहेत.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 3377 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या मंजुरीनंतर ओबीसी विभागाचे 2023-24 च्या योजनांसाठी तरतूद 7873 कोटी इतकी झाली आहे. ओबीसी विभाग स्थापन झाल्यानंतर एका वर्षांसाठी झालेली ही विक्रमी तरतूद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 3081 कोटी अधिक आहे.

पहा कोणत्या योजनेत किती तरतूद

या निधीतून मोदी आवास योजनेसाठी 1 हजार कोटींची तरतूद आहे. महाज्योतीसाठी 269 कोटी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी 158 कोटी, धनगर समाजाच्या योजनांसाठी 56 कोटी, अमृत संस्थेसाठी 15 कोटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 1192 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राज्य मागासवर्ग आयोग 360 कोटी, ओबीसी आणि व्हीजेएनटी महामंडळासाठी 20 कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना शैक्षणिक आणि सामूहिक विकास कामांसाठी हातभार लागेल, असा विश्वास या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.