शिवसेनेला पाठिंबा द्या, तब्बल 40 काँग्रेस आमदारांचं सोनिया गांधींना पत्र : सूत्र
काँग्रेसचे (Congress supports shiv sena) बहुसंख्य आमदार शिवसेनेला पाठिंब देण्याच्या बाजूने आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पेचात नवनवे ट्विस्ट येत आहेत. भाजपने सत्तास्थापनेला असमर्थता दर्शवल्यानंतर, राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. शिवसेना आता पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर अवलंबून आहे. राष्ट्रवादीने अद्याप आपल्याला प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलं आहे. मात्र काँग्रेसचे (Congress supports shiv sena) बहुसंख्य आमदार शिवसेनेला पाठिंब देण्याच्या बाजूने आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीयांमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. काँग्रेसचे (Congress supports shiv sena) आमदार राजस्थानमध्ये आहेत. राष्ट्रवादीची बैठक मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये होत आहे. तर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक वर्षा बंगल्यावर आणि शिवसेनेचे आमदार मालाडमधील द रिट्रीट हॉटेलमध्ये आहेत.
काँग्रेसचे 40 आमदार सेनेला पाठिंबा देण्यास तयार
काँग्रेसचे सर्व आमदार राजस्थानातील जयपूरमध्ये आहेत. काँग्रेसचे तरुण आमदारा सुरुवातीपासूनच शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूने होते. आता 44 पैकी तब्बल 40 आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार आहेत. तसं पत्र या आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं आहे.
राज्यपालांकडून शिवसेनेला 24 तासांची मुदत
भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. शिवसेनेचे निवडून आलेले 56 आमदार आणि त्यांना पाठिंबा देणारे 8 त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 63 वर पोहोचलं आहे. शिवसेनेला आज संध्याकाळी 7.30 पर्यंत राज्यपालांना सत्तास्थापनेचं पत्र द्यायचं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास…
पर्याय 1
शिवसेना- अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + काँग्रेस (44) + राष्ट्रवादी (54) = 162 बविआ (3) + समाजवादी पक्ष (02) + स्वाभिमानी (01) = 162+06 = 168 बहुमताचे संख्याबळ – 145
पर्याय 2
राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि काँग्रेस तटस्थ राहिली तर सभागृहाचे संख्याबळ 288 वजा 44 = 244 शिवसेना – अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + राष्ट्रवादी (54)+ काँग्रेस समर्थक अपक्ष (04) = 122 बहुमताचे संख्याबळ – 123
काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचं सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादी खेळू शकते, अशी चर्चा आहे.
संबंधित बातम्या
सत्तास्थापनेसाठी भाजपला 72, आम्हाला 24 तास का?, संजय राऊत यांचा सवाल