Mumbai Police : रामनवमी दिवशी हिंसाचार भडकावल्याप्रकरणी मुंबईत 6 गुन्हे दाखल, विविध प्रकरणात 61 जण ताब्यात
रामनवमी दिवशी (Ram Navami) जातीय तेढ निर्माण केली होईल किंवा हिंसाचार भडकावणे यावर पोलिसांची (Mumbai Police) बाकारईने नजर होती. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारण (Politics) अधिक गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. रामनवमीच्या दिवशी पोलिसांनी सहा गुन्हे दाख ल केल्याची माहिती जाहीर केली आहे.
मुंबई – रामनवमी दिवशी (Ram Navami) जातीय तेढ निर्माण केली होईल किंवा हिंसाचार भडकावणे यावर पोलिसांची (Mumbai Police) बाकारईने नजर होती. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारण (Politics) अधिक गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. रामनवमीच्या दिवशी पोलिसांनी सहा गुन्हे दाख ल केल्याची माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे विविध पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मानखुर्द येथे दोन गटात झालेल्या हाणमारीत पोलिसांनी तब्बल 30 जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबईत विविध प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिस अजून कसून चौकशी करीत आहेत. त्यामुळे अजून काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
6 cases registered in different police stations on charges of inciting violence during Ram Navami celebrations. 30 people arrested in the incident of clash between members of two communities in Mankhurd. Total of 61 persons arrested in the different cases: Mumbai Police
— ANI (@ANI) April 18, 2022
मुंबई पोलिसांचं बारकाईने लक्ष
गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला. नाहीतर आम्ही सुध्दा मशिदीच्या समोर हनुमान चाळिसा भोंग्यावरती लावणार असं जाहीर केलं. त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी घाटकोपरमध्ये पाहायला मिळाले. तेव्हापासून मुंबईत पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. प्रत्येक गोष्टीवर मुंबई पोलिसांनी लक्ष ठेवल्याने विविध पोलिस स्टेशनमध्ये 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मानखुर्दमध्ये दोन गटात राडा
रविवारी काढण्यात आलेल्या रामनवमीच्या मिरवणुकीवरून मानखुर्द येथील म्हाडा कॉलनीजवळ दोन समुदायांमध्ये झालेल्या भांडणात दोन जण किरकोळ जखमी झाले. 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मानखुर्द पोलिसांनी दोन्ही गटातील सदस्यांविरुद्ध दोन एफआयआर नोंदवून सात जणांना अटक केली. रविवारी रात्री उशिरा तरुणांचा एक गट ‘जय श्री राम’ म्हणत रामनवमीच्या मिरवणुकीतून घरी परतत असताना ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा ते अल्पसंख्याक बहुल भागातून गेले तेव्हा काही स्थानिकांनी विरोध केला आणि दोन गटांमध्ये वाद आणि मारामारी झाली होती.