येत्या 7-8 तारखेला आचारसंहिता लागू शकेल: शरद पवार
नाशिक: येत्या 7-8 तारखेला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. ते नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते. निवडणुकीत राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल मला शंका आहे. गोंदिया भंडारा मतदारसंघाच्या निवडणुकांवेळी 700 मतदान केंद्रांवर मशीन बंद होते. पराभव होणार हे माहीत असल्याने रडीचा डाव होणार, असं यावेळी […]
नाशिक: येत्या 7-8 तारखेला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. ते नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.
निवडणुकीत राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल मला शंका आहे. गोंदिया भंडारा मतदारसंघाच्या निवडणुकांवेळी 700 मतदान केंद्रांवर मशीन बंद होते. पराभव होणार हे माहीत असल्याने रडीचा डाव होणार, असं यावेळी पवार म्हणाले.
लोकांना बदल हवा आहे. जे तीन राज्यात झालं ते सर्वत्र होणार आहे. त्यामुळे काही वेगळं करण्याशिवाय गत्यंतर नाही हे कळालं, असं पवारांनी सांगितलं.
जवानांची हत्या झाल्यानंतर केंद्राची बैठक बोलावली. त्यावेळी मी बोललो, देशावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल तर जवानांवंच्या पाठीशी उभं राहू. निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली तर त्याचाही विचार होऊ शकतो. पण देशावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही. पंतप्रधानांनी जवानांना मोकळीक दिली. त्या मोकळीकीचा जवानांनी लाभ घेतला. जगात भारताची प्रतिष्ठा वाढली, ती जवानांमुळे वाढली, असं पवार म्हणाले.
आपण भूमिका घेतली की राजकारण आणायचं नाही. भाजपचे लोक मात्र राजकारण करु लागले. गावोगावी झेंडे घेऊन नाचायला लागले. शहिदांच्या पत्नीने देखील सांगितलं की राजकारण करु नये. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा कम्युनिस्टांना सांगितलं नाही. त्यांनी भाजपा सांगितलं. त्यांनादेखील भाजपच्या या वागण्याचा संताप आला आहे. लोकांना कळालं कष्ट कोणी केलं, त्याग कोणी केले आणि छाती कोण बडवतंय, असं टीकास्त्र पवारांनी सोडलं.
पाकिस्तानला पहिल्यांदा धक्का देण्याचं कामं यशवंतराव चव्हाण आणि भारतीय जवानांनी केलं. इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन देश केले. संकट आलं आणि त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, असा इशारा यावेळी पवारांनी दिला.
अंबानी हा संरक्षण क्षेत्रातील तज्ञ माणूस, म्हूणन त्यांना राफेल विमानांचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, असा टोला पवारांनी लगावला.
गांधी परिवाराने देशाचं नुकसान केलं असं मोदी म्हणतात. 11 वर्ष देशाचे पंतप्रधान राहूनही इंदिराजींनी लोकशाही टिकवून ठेवली. गरिबांच्या सुख दुःखात सामावून घेतलं. अटलजींनी पार्लमेंटमध्ये इंदिराजींना दुर्गा म्हटले. ज्यांना अटलजी दुर्गा म्हणाले त्यांनी देशाचं वाटोळं केलं? प्रधानमंत्र्यानी जपून बोललं पाहिजे, असा इशारा पवारांनी दिला.
देशाच्या सगळ्या विरोधी पक्षाला मी एकत्र करतोय. या देशाची सूत्रं हुकूमशहाच्या हाती जातील. मोदींच्या रुपाने देशावर आलेली आपत्ती दूर करु. सत्य आणि वास्तव विचार लोकांपर्यंन पोहोचवावे.