डॉ. प्रीतम मुंडेंसह महाराष्ट्रातील आठ ते नऊ खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. मंत्रीपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून आठ ते नऊ खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ खासदारांचा यामध्ये समावेश आहेच, शिवाय बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचीही मंत्रीपदी वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास […]
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. मंत्रीपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून आठ ते नऊ खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ खासदारांचा यामध्ये समावेश आहेच, शिवाय बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचीही मंत्रीपदी वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यांच्या मुलाच्या नावाची चर्चा होती. पण रामविलास पासवान हे स्वतःच मंत्रीपद घेणार असल्याची माहिती आहे. तर महाराष्ट्रातील आठ ते नऊ जण, ज्यामध्ये नागपूरचे खासदार नितीन गडकरी, राज्यसभा खासदार पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, सांगलीचे खासदार संजय काका पाटील आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या वाट्याला तीन मंत्रीपदे : सूत्र
केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेच्या वाट्याला तीन मंत्रीपदं येणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं दिली जाऊ शकतात. 30 मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळीच सर्व मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे.
राज्यात शिवसेनेकडून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, राज्यसभेचे खासदार अनिल देसाई आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेला ही तीन मंत्रीपदं मिळाल्यानंतर या तीन खासदारांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं. शपथविधीसाठी अवघे दोन दिवस उरले असल्याने कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार याकडे लक्ष लागलंय.
आरपीआयचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांनाही पुन्हा मंत्रीपद दिलं जाणार आहे. सध्या मंत्री असलेल्या नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. तर बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर सांगली जिल्ह्याला मंत्रीपद मिळावं ही जुनी मागणी आहे. त्यामुळे संजय काका पाटील यांची वर्णी लागू शकते.