मी माझ्या बायकोला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवणारचं; अभिजीत बिचुकले यांना नुसता विश्वासच नाही तर फुल कॉन्फीडन्स

अभिजीत बिचुकले यांना नुसता विश्वासच नाही तर फुल कॉन्फीडन्स देखील आहे.

मी माझ्या बायकोला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवणारचं; अभिजीत बिचुकले यांना नुसता विश्वासच नाही तर फुल कॉन्फीडन्स
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 11:00 PM

अभिजीत पोते, tv9 मराठी, पुणे : नगरसेवक पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी आता आपल्या बायकोला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या पत्नीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवणारचं असं विधान अभिजीत बिचुकले यांनी केले आहे. याबाबत अभिजीत बिचुकले यांना नुसता विश्वासच नाही तर फुल कॉन्फीडन्स देखील आहे.

अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकाणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. यावर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिला आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही माझे मित्र आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे आणि आमदारांना फोडलं. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आली त्याचवेळी शिवसेना फुटली असं बिचुकले म्हणाले.

अजित दादांनी केलेल्या भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस यांना माहिती होता. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आणि असं ठरलं की अडीच वर्षानंतर म्हणजेच आता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल आणि बरोबर अडीच वर्षानंतर शिवसेना फुटली आणि मग या मागचा मास्टरमाईंड कोण? असा सवाल बिचुकले यांनी केला.

आता महाराष्ट्रात अभिजीत बुचुकलेच्या पक्षाचाच आमदार आणि खासदार झाला पाहिजे. पवार साहेबांना नेस्तानाबूत करण्यासाठी हा सगळा कट रचला गेला आहे.

शिवसेना नवरा आहे आणि भाजप बायको आहे. या दोघांनी मिळूनच हे सगळं कारस्थान रचलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शिवसेना फोडली.

हे सर्व लोक जनतेला उल्लू बनवत आहेत. 2024 ला माझ्या पक्षातलेच आमदार निवडून आणा. 2024 मध्ये मी माझ्या पत्नीला मुख्यमंत्री बनवणार असेही बिचुकले म्हणाले.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.