Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरतेच्या मार्गातून पळून आलेले आमदार नितीन देशमुखांच्या अडचणी वाढल्या, नागपुरात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपुरात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.

सूरतेच्या मार्गातून पळून आलेले आमदार नितीन देशमुखांच्या अडचणी वाढल्या, नागपुरात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 2:35 PM

नागपूरः  महाराष्ट्रातून नॉट रिचेबल होत आधी सूरत आणि नंतर गुवाहटी गाठणाऱ्या शिंदे गटातील आमदारांची बंडखोरी (MLA Rebel) हे राज्याच्या राजकारणात गाजलेलं महानाट्यच आहे. याच नाट्यातील एक पात्र म्हणजे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh). मुंबईतून सूरतेला (Surat) निघालेले मात्र गुजरात सीमेवरूनच परत फिरलेले आणि सध्या ठाकरे गटातील हे आमदार. नितीन देशमुख यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. त्यांच्याविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पीएसआय सखाराम एकनाथ कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नागपूर शहरामध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन-2022 सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने कांबळे यांची रवि भवन मुख्य प्रवेशद्वार इथे ड्यूटी लागली होती. सकाळी रवि भवन येथे येणाऱ्या वाहनांचे पासेस चेक करुन तसेच येणाऱ्या व्यक्तींचे तेथेच बाजूला लागलेल्या पेन्डॉलमध्ये पासेस तयार झाल्यानंतर ते पासेस चेक करुन त्या व्यक्तींना आत प्रवेश देत होते.

यावेळी पोलीस निरीक्षक शरद कदम हे तसेच सीआरपीएफचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी असे कर्तव्य करीत होते. दरम्यान, काल 27 डिसेंबर रोजी रवि भवन मुख्य प्रवेशद्वाराजवळ लोकांची खूप गर्दी झाली होती.

तेव्हा एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून एक व्यक्ती खाली उतरुन त्याचे सोबत पाच ते सहा व्यक्तींना येऊन कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस निरीक्षक कदम तसेच कांबळे यांच्याशी हुज्जत घातली. तसेच कर्तव्य बजावताना कामात अडथळे आणले, असा आरोप कांबळे यांनी केला आहे.

शासकीय कर्तव्य करीत असताना मला हाताने धक्का देवून जबरदस्तीने त्यांच्या सोबत तेथे जमा झालेल्या काही लोकांना विना पासचे रवि भवनच्या आतमध्ये बळजबरी प्रवेश केला, अन् प्रवेश करतांना त्याने म्हटले की, ‘मी बाळापूर विधान सभा क्षेत्राचा आमदार नितीन देशमुख आहे, तुला व तुझ्या पीआय ला उद्या पाहून ‘घेतो’ असे म्हणून शासकीय काम करीत असतांना मला धक्का देवून माझ्या कर्तव्यापासून परावृत्त करून कामात अडथळा निर्माण केला.

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपुरात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पीएसआय सखाराम एकनाथ कांबळे (वय 31 वर्ष) यांनी दिलेल्या तक्रारीवरून 353, 186, 448, 294, 506, 34 या कलमानुसार नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...