मुंबई : शिवसेना तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असं म्हणत एका चिमुकल्यानं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या समोरच घोषणा दिलीय. आदित्य ठाकरे यांच्यासमोर घोषणा देणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात (Social Media Viral) व्हायरल केलाय. चिमुकल्याची घोषणा दिल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिलेली रिएक्शनही पाहण्यासारखी होती. आदित्य ठाकरे गिरगावमध्ये (Girgaon) आले असता चिमुरड्याने घोषणा दिल्या होत्या.
गिरगाव मधील शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग सपकाळ यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली होती. त्यावेळी चिमुकल्यानंतर आदित्य ठाकरे आल्यानंतर त्यांच्या समोर घोषणा दिली. हात उंचावून शिवसेना आगे बढे, आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या.
#Watch : छोट्या शिवसैनिकाला पाहिलात का.. आदित्य ठाकरेंसमोर दिली घोषणा, पाहा काय म्हणाला? @AUThackeray @ShivSena pic.twitter.com/L22U7nWCU4
— Siddhesh Sawant (@ssidsawant) September 3, 2022
चिमुकला घोषणा देतोय पाहून आदित्य ठाकरेही थांबले. सोबतचे कार्यकर्ते यांनाही चिमुकल्याच्या घोषणा ऐकून काहीसे चकीत झाले. प्रत्येकाच्या ओठांवर चिमुकल्याचा आत्मविश्वास पाहून स्मित हास्य उमटलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या चिमुकल्याचा हात धरला आणि तू कितवीत आहेस, असं विचारलं.
नंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात या चिमुरड्याचा हात धरुनच आदित्य ठाकरे आतमध्ये आले. शेवटी या चिमुरड्यासोबत त्यांनी फोटोसेशनही केलं. या सगळ्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झालाय.
शिवसेना उभी फूट पडल्यानंतर आता खरी शिवसेना कुणाची, या वरुन राजकीय घमासान सुरुच आहे. या राजकीय लढाईचा पुढचा टप्पा आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. एकीकडे कोर्टाची लढाई सुरु असेपर्यंत ठाकरे कुटुंबीयांकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणं, गणेशोत्सवानिमित्त मंडळांमध्ये जाणं आणि शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा एकजुटीनं उभी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर उभं ठाकलंय.
गिरगाव दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर तिखट शब्दांत टीका केली होती. शिवसेना सोडलेल्या कोणत्याही नेत्याने एवढा निर्लज्जपणा केलेला नव्हता, असं ते म्हणाले. दरम्यान, सध्या बाहेर मुखवटा घालून काही लोक फिरत आहेत आणि आपणंच खरी शिवसेना आहोत म्हणून दावा करत आहेत, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता.