Kalicharan Maharaj : राजा म्हणजे आमदार खासदार, जेवढा राजा हिंदुत्ववादी तेवढं हिंदू धर्माचे कल्याण होईल – कालीचरण महाराज
धर्माचे रक्षण केले तर राष्ट्राचे रक्षण होईल, हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हायला पाहिजे. शत प्रतिशत मतदान हे हिंदूंना करावं लागणार आहे. कट्टर हिंदुत्ववादी ही नेते निवडून द्या.
बारामती : आमची तोडलेली 5 लाख मंदिरे (Five lack temple) परत हवी आहेत, गोवंश हत्या बंदीचा केंद्रीय कायदा व्हायला पाहिजे. लव्ह जिहाद, दहशतवाद संपवण्यासाठी त्यासाठी राजकारणाचे (Politics) हिंदुत्ववादी होणे गरजेचे आहे. आपण ज्या देव देविताना पूजत आहे. ते सर्व राजे महाराजे होते. ते दृष्ट राज्यांच्या संहारासाठी निरंतर लढत होते. त्यामुळे आपल्याला आपल्या भागातून हिंदुत्ववादी नेते राजकारणात निवडून दिले पाहिजेत. राजा म्हणजे आमदार, खासदार, जेवढा राजा हिंदुत्ववादी तेवढं हिंदू धर्माचे कल्याण होईल. हिंदू वोटर बँक बनण्यासाठी जातीयवाद, धर्मवाद प्रांतवाद हे मुख्य अडथळे आहेत. हे चार वाद नष्ट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर ते धर्म नष्ट करतील असं वक्तव्य काली चरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केलं आहे.
धर्माचे रक्षण केले तर राष्ट्राचे रक्षण होईल
धर्माचे रक्षण केले तर राष्ट्राचे रक्षण होईल, हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हायला पाहिजे. शत प्रतिशत मतदान हे हिंदूंना करावं लागणार आहे. कट्टर हिंदुत्ववादी ही नेते निवडून द्या. याची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली त्याचा आनंद आहे. जो हिंदुत्ववाची भाषा करेल त्याला निवडून द्या असं कालीचरण महाराजांनी उपस्थितांना सांगितलं.
कालीचरण महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती
कालीचरण महाराज हे धर्मगुरू आहेत. त्यांचे खरे नाव अभिजित धनंजय सराग आहे. त्यांचा जन्म अकोला, महाराष्ट्र येथे झाला. त्याचे वडीलांचे नाव धनंजय सरग असं आहे. कालीचरण यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण शहरातील जिल्हा परिषद शाळेतूनच झाले. धार्मिक कार्यात रुची असल्यामुळे त्यांनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे. कालीचरण महाराज इंदूरला गेले आणि तेथेच ते भय्यूजी महाराजांच्या संपर्कात आले आणि त्यांच्याशी धार्मिक कार्यात सहभागी झाले.