Raosaheb Danve : छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, रावसाहेब दानवेचा व्हिडिओ व्हायरल, राज्यभर वातावरण पुन्हा तापले

Raosaheb Danve : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत..

Raosaheb Danve : छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, रावसाहेब दानवेचा व्हिडिओ व्हायरल, राज्यभर वातावरण पुन्हा तापले
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 9:47 PM

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांवरुन राज्यात पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Sinha Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही मालिका खंडीत होण्याऐवजी वाढतच आहे. शिंदे गटातील आणि भाजपच्या मंत्री, आमदारांनी केलेल्या वक्तव्यांनी वादात आगीचे काम केले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी छत्रपती शिवराय यांचा एकेरी उल्लेख केल्याने पुन्हा वाद उफाळला आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याप्रकरणात व्हायरल व्हिडिओत दानवे बोलताना दिसत आहेत.महाराजांवरील वक्तव्याची चौकशी व्हायला हवी. वक्तव्य वादग्रस्त होईल की नाही, हे तपासण्यात यावे, असे ते म्हणाले.  आपण शिवप्रेमी असल्याचा दावा ही त्यांनी केला.

पण याच व्हिडिओत बोलताना, त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण पेटले. साताऱ्यात तर याचे जोरदार पडसाद दिसून आले. खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला.  त्यांनी दानवे यांच्या पुतळ्यावर राग काढला.

हे सुद्धा वाचा

रविवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्थाजवळ रावसाहेब दानवे,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप पक्षा विरोधात घोषणबाजी केली. तर मराठा संघटनांही याप्रकरणात आक्रमक झाल्या आहेत.

‘भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याप्रकरणात विचारणा केली असता, त्यांनी हात जोडले.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...